पक्ष संघटनेसाठी मंत्रीपेक्षा मी कार्यकर्ता : ना.गुलाबराव पाटील

जळगाव:  राजकारणातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संपर्क हा अतिशय महत्वाचा असून ही राजकारणात मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी मंत्रीपेक्षा मी कार्यकर्ता आहे.  ”शाखा हा शिवसेनेचा महत्वाचा घटक असून प्रत्येक शाखेचा  व विकास कामांचाहा फलक हा गावात लागलाच पाहिजे” फलक हा शिवसेनेचा आरसा असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

ते पक्षाच्या लोकसभा मेळाव्यात बोलत होते. लवकरच जळगावात पक्षाचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. अजिंठा विश्रामगृहात जळगाव शिवसेना लोकसभेचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी मान्यवर बोलत होते.मेळाव्याच्या  अध्यक्षस्थानी शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल चौधरी होते. यावेळी आमदार किशोर पाटील,  जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, महिला आघाडीच्या सरीता कोल्हे- माळी , जळगाव लोकसभा मतदारसंघातील धरणगाव, जळगाव,  पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव तालुक्यातील  शिवसेना, युवासेनेचे सर्व  तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख , तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सरपंच कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविकात तिन्ही जिल्हा प्रमुख निलेश पाटील, वासुदेव पाटील व रावसाहेब पाटील यांनी जळगाव लोकसभेतील संघटना बांधणी, झालेली विकास कामे व बुथरचनाबाबत विस्तृत माहिती विषद केली. सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले. आभार महिला जिल्हा प्रमुख सरीताताई कोल्हे – माळी यांनी मानले.

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची अतिशय मजबूत स्थिती जास्तीत जास्त सरपंच, पंचायत समिती आदींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व असून  शिवसेनेचे 3 आमदार व 5 पंचायत समिती सभापती असून झेडपीचे 15 सदस्य असल्याने जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही राहणार असल्याचे सांगितले. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा मतदार संघात केलेल्या विकास कामांची व पक्ष संघटना बांधणीबाबत सविस्तर माहिती दिली.

आगामी निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे- चौधरी

लोकसभेसाठी जिल्ह्यात पुरक वातावरण असून आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करण्यासाठी एकत्र येवून सज्ज राहावे, प्रत्येक तालुक्यातील संघटना बांधणीसाठी शाखा नुतनीकरण करा, पंचायत समिती गणात बैठका घ्या, शिवसैनिक नोंदणीकरून गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक नोंदणी करण्याचे आवाहन करून लवकरच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे सुतोवाच शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हासंपर्कप्रमुख सुनिल चौधरी यांनी केले. जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही राहणार असल्याचेही सुनिल चौधरी यांनी सांगितले.  सुरुवातीला नवनियुक्त अंबरनाथ येथील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची जळगाव लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील व जिल्हा प्रमुख यांनी सत्कार केला. याप्रसंगी जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिपक चौधरी, डॉ. सुषमा चौधरी तसेच पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील कार्यकर्ते रवींद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री व संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

जळगाव लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा  

शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी मांडली भूमिका जळगाव लोकसभा निवडणूकीकरिता शिवसेनेला वातावरण पूरक आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभेची जागा आम्हाला सोडण्यासाठी आग्रही आहेत याबाबत आम्ही मागणी करणार असून महायुतीत असलेल्या शिवसेनेने जळगाव लोकसभा जागेवर दावा केला आहे. देशात लोकसभा निवडणूक पूर्व तयारी सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सूचनेनुसार 7 जानेवारी रोजी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यात आले असता पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जळगाव लोकसभेच्या जागेवर आग्रह असल्याचे सांगितले.

लोकसभा आढावा बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी जि. प. सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे, जिल्हप्रमुख निलेश पाटील, जिल्हाप्रमुख, ललित कोल्हे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडणुका तोंडावर असून बूथस्तरावरून काम सक्षम करण्यात करावे, आपण केलेल्या कामाचे बोर्ड लावून जनतेपर्यंत काम पोहचवावे असे आवाहनही यावेळी नेत्यांनी केले असून पाचोरा भडगाव मतदार संघात प्रथमच महिलांना बूथ प्रमुखची जबाबदारी दिली असून हा राज्यातील पाहिला प्रयोग असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.