Patanjali : इंडियन मेडिकल असोशिएशने रामदेव बाबांच्या पतंजली विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने आज निर्णय दिलाय. न्यायालयाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी पतंजली आणि कंपनीच्या मालकाला 3 आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी याआधी न्यायालयाने पतंजली कंपनीला नोटिस बजावली होती मात्र, तरीहि पतंजलीकडून अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जात होत्या. या प्रकरणी आज परत न्यायालयाकडून नोटीस देऊन नोटिसला उत्तर देण्यासाठी कंपनीच्या मालकाला 3 आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए. अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबण्यात याव्यात, असे न्यायालयाने म्हटले होते. नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने म्हटले होते की, आदेशांचे पालन केले नाही तर 1 कोटींचा दंड ठोठावण्यात येईल.