---Advertisement---

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने मानसिक तणावातून संपवले जीवन

by team
---Advertisement---

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावात येत पतीने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकरावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी (३४,रा.माऊली लॉन्स नवीन नाशिक )हे दि.२० रोजी घरातून बेपत्ता झाले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार करण्यात आली होती. दि.२२ रोजी एक मृतदेह बापू पुलानजीक तरंगतांना बोटिंगला आलेले अंबादास तांबे यांनी बघितला होता. त्यांनी याबाबत तात्काळ गंगापूर पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान सदर मृतदेह हा राकेश यांचा असल्याची पोलिसांना खात्री झाली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात राकेश यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यानंतर राकेश यांच्या नातेवाईकांनी त्यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला. मात्र अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सदर घटनेत तपासानंतर काही तथ्य आढळ्यास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल व सध्या हा प्रकार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा वाटत असल्याने तसा गुन्हा दाखल करण्याचे नातेवाईकांना आश्वासन दिले.

या प्रकरणी अंबड पोसांत राकेश यांची ३० वर्षीय पत्नी व तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी (२५,रा.बजरंगवाडी ) यांच्यांतील अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावात आल्याने राकेश यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि वसंत खतेले करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment