पत्नीने फक्त स्टूल उचलण्यास सांगितले, पतीने केले असं काही की…

crime news : पती-पत्नी मध्ये भांडण हे होताच असतात. कधी कधी वाद हा विकोपाला देखील जातो.कधी कधी हे भांडण लगेच संपत पण काहीवेळा ही भांडण एवढी टोकाला जातात, की रागाच्या भरात एखादं नको ते कृत्य होऊन बसतं.अशीच एक घटना समोर आली आहे.एका शुल्लक कारणावरून संतापलेला पतीने पत्नीला बेदम मारहाण केली.साफसफाई करताना, झाडू मारताना पत्नीने पतीला फक्त स्टूल उचलून बाजूला ठेवायला सांगितलं. मात्र याच मुद्यावरून तो एवढा संतापला की त्याने पत्नीचा जीवच घ्यायचा प्रयत्न केला.

खुशाल जाधव असे आरोपी पतीचे नाव पती-पत्नी गावी गेले असता पत्नीच्या मामाला तिच्या गळ्यावर काही व्रण दिसले. हे कसं झालं असं विचारत त्यांनी तिची विचारपूस केली. मात्र त्यानंतर त्यांना जे समजलं ते ऐकून ते हादरलेच.. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खुशाल जाधव आणि त्याची पत्नी तनिषा हे दोघेही कल्याण पूर्व येथील मलंगडरोड परिसरातील एका सोसायटीमध्ये राहतात. आठ महिन्यांपूर्वी त्या दोघांचे लग्न झाले. मात्र खुशाल हा काहीच काम करत नसल्याने त्या दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायची. 22 ऑक्टोबर रोजी खुशाल आणि तनिषा हे दोघेही गावी गेले होते. तेव्हा तनिषाच्या मामाला तिच्या गळ्यावर काही व्रण दिसले. हे कसं झालं असं विचारत त्यांनी तिची विचारपूस केली.काम करत होती.

घरात साफसफाई करायची आहे, त्यामुळे लोखंडी स्टूल उचलून गॅलरीमध्ये ठेवा, एवढंच तिने पती खुशाल याला सांगितलं. मात्र ते ऐकताच खुशाल संतापला, आणि त्याने तनिषाला थेट मारहाणच करण्यास सुरूवात केली. ‘ तू नेहमी मला काही ना काही काम सांगतेस, बोलत राहतेस, आता तुझा आवाजच बंद करतो’ अशी धमकी त्याने दिली.मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिला बेदम मारहाण केली आणि गॅलरीतील कपडे वाळत घालण्याची नायलॉनची दोरी आणली. ती दोरी तिच्या गळ्यात अडकवून त्याने तिला वर लटकवण्याचा प्रयत्न केला.तिने या प्रसंगातून कसाबसा आपला जीव वाचवला व सुटका केली.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.