जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रविवार 29 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणुकीच्या प्रचारात अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील मतदारांपर्यंत संपर्क करत सदर निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
विद्यापीठ स्थापनेपासून विद्यापीठ विकास हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवत विद्यापीठ विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या पावतीच्या आधारे आतापर्यंत झालेल्या प्रत्येक पदवीधर अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार प्रामुख्याने निवडून येतात. विद्यार्थी दशेत युवक चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्यांना पदवीधर अधिसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी देणारे पॅनल म्हणून विद्यापीठ विकास मंचची ओळख आहे.
विद्यापीठ विकास मंचतर्फे यावर्षीच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गात मराठे अमोल साहेबराव, निकम सुनील राजधर, पाटील अमोल नाना , सोनवणे अमोल साहेबराव, झोपे निलेश रमणराव, इतर मागासवर्गीय गटातून झाल्टे नितीन छगन, एस सी गटातून खरात दिनेश उत्तम, एस टी गटातून ठाकूर नितीन लीलाधर, एन टी गटातून चव्हाण दिनेश दलपत, महिला गटातून महाजन स्वप्नाली तुळशीराम या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
रविवार, २९ जानेवारी रोजी होणाऱ्या पदवीधर अधिसभा ( सिनेट) निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचाच्या उमेदवारांना पसंतीक्रमानुसारच मतदान करुन विजयी करावे, असे आवाहन निवडणुक प्रमुख दिपक बंडू पाटील यांनी केले आहे.