पारोळा : येथील तहसील कार्यलयात पदवीधर मतदारांनी नाव नोंदविण्या बाबत राजकीय पदाधिकार्याची बैठक तहसीलदार ए बी गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यात जास्तीत जास्त पदवीधरांनी नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजविण्याचे आवाहन गवांदे यांनी केले.
पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२३ साठी नाव नोंदणी सुरू आहे. नाव नोंदविण्यासाठी अर्जदार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असणे आवश्यक असून अर्जासोबत आधार कार्ड,पदवी प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.नोंदणीची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर असून जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन तहसीलदार गवांदे यांनी केले.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरण अनुष्ठान,भाजपा तालुका सरचिटणीस सचिन गुजराथी यांच्यासह ना. तहसीलदार एस पी पाटील, महसूल सहा.सुदाम भालेराव, निवडणुक सहा. विलास पाटील, संगणक चालक अंकित साळी उपस्थित होते.