पदवीस्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यास विद्यापरिषदेची मान्यता

जळगाव : पदवीस्तरावर सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली.कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि मानव्य विज्ञान विद्याशाखा या तीन विद्याशाखांमधील विविध विषयांच्या अभ्यासमंडळांनी सर्व विषयांचे नवीन अभ्यासक्रम तयार केले आहेत. विद्यापरिषदेच्या बैठकीत या सर्व नवीन अभ्यासक्रमांचे विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते.

या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापरिषदेने मान्यता दिली. तसेच नवीन शैक्षणिक धोरण पदवीस्तरावर राबविण्यासाठी इतरांच्या तुलनेत आघाडी घेतल्याबद्दल सर्व अभ्यासमंडळांच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले.या बैठकीत प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, प्राचार्य डॉ. शशिकांत बऱ्हाटे, प्राचार्य डॉ. विजय बहिरम, प्राचार्य डॉ. मिलींद बिल्दीकर, प्राचार्य डॉ. डी.ए. सुर्यवंशी, प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी, प्राचार्य डॉ. बी.वाय. रेड्डी, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. गौरी राणे, डॉ. नारखेडे, प्रा. महेंद्र रघुवंशी, प्रा. नितेश चौधरी, प्रा. योगेश पाटील, प्रा. भूपेंद्र केसुर, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. जितेंद्र तलवारे, डॉ. सुधीर भटकर आदींनी सहभाग घेतला. नवनियुक्त सदस्य राजाराम कुलकर्णी तसेच प्रा. चित्ररेखा काबरे यांनीही बैठकीत भाग घेतला. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.

नव्या बदलांना आपण सामोरे जाणार असून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून कार्यशाळा घेतल्या जात आहेत

.- कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी