---Advertisement---
महाराष्ट्र: उद्धव ठाकरे यांना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, बाळासाहेबांनी ते होऊ दिले नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात वैचारिक निष्ठेला तिलांजली दिली. उद्धव ठाकरे असे काही करतील, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे येथे आयोजित प्रचारसभेत सांगितले.
शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले, आमचा पक्ष हा वैचारीक निष्ठेला सर्वाधिक महत्त्व देतो. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असा कसा वागू शकतो, यावर आमचा विश्वास नव्हता. मात्र, ही आमची चूक होती. बाळासाहेब ठाकरेंविषयी असलेल्या आदरामुळे आम्ही काही गोष्टी समजून घेतल्या. यामुळे कधीच काही बोललो नाही.
मात्र, जेव्हा आम्ही १९९९ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आलो, तेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरला होता. मात्र, बाळासाहेबांनी हस्तक्षेप करीत त्यांना बाजूला सारले. महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाकरे यांच्या सूचनेवरून भाजपाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचला गेला. विधिमंडळात भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्यात आले. ठाकरे हे कुठल्या थराला जाऊ शकतात, हे आम्हाला समजले