पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांची काठीवाडी पशुपालकांना भेट

जळगाव : पशुसंवर्धन विभागामार्फत 31 मे रोजी एरंडोल जवळ महामार्गा लगत स्थायिक असलेले 8 काठीवाडी पशुपालकांना भेटी देण्यात आल्या. येथे साधारण 400 गाई व 130 म्हैस या पालकांकडे आहे. येथे पुरेसा चारा उपलब्ध असून जवळच पाणी सुद्धा उपलब्ध आहे तसेच चराई साठी जवळचे शेतात चराई करण्यात येते याबाबत माहिती घेण्यात आली.

चरायला जाण्याची वेळ सकाळी 7 ते 11 व संध्याकाळी 4 नंतर असावी तसेच दुपारचे वेळेस सावलीत जनावरे ठेवणे त्यांना दिवसातून तीन ते 4 वेळा मुबलक थंड पाणी पाजणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच गाई- म्हशी ची पाहणी केली असता त्यातील काही गाई वयस्कर आणि अशक्त असल्याने त्यांना तत्काळ औषधुपचार, mineral mixture व जंतनाशक देण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पशसंवर्धन डॉ. अशोक महाजन धरणगाव, डॉ. प्राप्ती पारखे, डॉ. सुधाकर शेळके, डॉ. राहुल साळुंके, वासू वंजारी व MVU स्टाफ सुदर्शन पाटील LSS आणि भूषण कोळी ड्रायव्हर हे उपस्थित होते.