पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

आता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी दिली .

नवीन आणि आताचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची गरज आहे. तशा पद्धतीने शिकवल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज नसल्याचे शिक्षण मंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केले होते.

सोबत राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ञ यांच्याशी चर्चा  केली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थीहित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने यासाठी सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी सांगितले.