Ind-Pak : जगभरात जिथे पण जाल तिथे, तुम्हाला मोदी भक्त आणि भारतप्रेमी भेटतील. असच काहीस घडलं आहे एका पाकिस्तानी युट्युबर सोबत. सोहेब चौधरी हा पाकिस्तानी यूट्यूबर अनेकदा भारत-पाकिस्तान संबंधांवर व्हिडिओ बनवताना दिसतो. चौधरी यांच्या व्हिडिओची लोकही आतुरतेने वाट पाहत असता अलीकडेच त्याने त्याच्या यूट्यूब अकाऊंट Real Entertainment TV वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यावेळी व्हिडिओत तो गुजराती मुस्लिम मोहम्मद रफिक याच्याशी खास चर्चा करताना दिसत आहे . विशेष म्हणजे जेव्हा सोहेबने रफिकशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलले तेव्हा त्याने मोदींना आपले नातेवाईक म्हटले. साहेबांनी पुन्हा विचारले की तुम्ही मुस्लिम आहात मग मोदी तुमचे नातेवाईक कसे झाले? यावर रफिकने सांगितले कि मी तेली जातीचा आहे तेली आणि मोदीजीही माझ्या जातीचे आहेत म्हणून ते माझे नातेवाईक आहे असे उत्तर रफिकने दिले.
तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीनेही मोहम्मद रफिकच्या विधानाशी सहमती दर्शवली. त्यांनीही होकार दिला आणि आमचा व्यवसाय एकच असल्याचे सांगितले. म्हणूनच आम्ही मोदींचे नातेवाईक आहोत. भारतात तेली जातीचे लोक तेल खाण कामगार म्हणून ओळखले जातात. यामुळेच दुबईत राहणारे तेली जातीचे लोक स्वतःला मोदींच्या जातीशी जोडतात आणि त्यांना त्यांचे नातेवाईक म्हणतात.संभाषणादरम्यान, पाकिस्तानी यूट्यूबर सोहेब चौधरी भारतीय नागरिकांवर खूपच प्रभावित दिसला. किंबहुना तिथे सापडलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या राज्याचे नाव अभिमानाने सांगत होती.