पाचोऱ्याच्या जवानाला मिझोराम येथे वीरमरण ; सोमवारी अंत्यसंस्कार

पाचोरा : शहरातील जवान चेतन हजारे यास मिझोराम येथे देशसेवा बजवताना शनिवार 15 जून रोजी शहीद झाले. चेतन हजारे यांना शनिवारी, रात्री दहा वाजता वीरमरण आल्याची दुःखद घटना घडली. या घटनेने शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे,.

पाचोरा शहरातील देशमुख वाडी भागातील रहिवासी असलेला चेतन हजारे हा तरुण सीमा सुरक्षा दलात कार्यरत होता. त्यास मिझोराम येथे देशसेवा बजवताना शनिवार, 15 जून रोजी रात्री दहा वाजता वीरमरण आले. सुमारे दहा वर्ष त्यांनी देशसेवा बजवल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या जवानांचे पार्थिव उद्या सोमवार 17 जून रोजी सकाळी सहा वाजता पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथे आणले जाणार आहे. यानंतर, सकाळी नऊ वाजता त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या दुर्दैवी घटनेने पाचोरा शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, एक बहीण, जावई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.