पाचोऱ्यात आज हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहीर कीर्तन

पाचोरा :  जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथे शेठ मुरलीधर जी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणावर सोमवार, १८ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.याप्रसंगी पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार सन्मान हभप समाज प्रबोधनकार निवृत्ती म हाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कीर्तन सोहळ्याला साथ संगत सहकार्य लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा व हभप मृदुंगाचार्य सचिन महाराज, गायनाचार्य किरण महाराज शेटे करणार आहेत.

या कीर्तन सोहळ्याला पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसचे न.पा. गटनेते संजय वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुचिता दिलीप वाघ, अध्यक्षा तनिष्का ग्रुप पाचोरा ज्योती वाघ तसेच समस्त वाघ परिवार (राणीचे बांबरुड) व मित्रपरिवार पाचोरा यांचेतर्फे करण्यात आले आहे.