पारोळा : येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतेही व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असून विकतचे पाणी घेण्याची वेळ प्रवाश्यांवर येवून ठेपली आहे.
पारोळा बसस्थानकाचे आ. चिमणराव पाटील यांच्या निधीतून काँक्रीटीकरण होत आहे. बसस्थानकाचा काँक्रीटीकरण आणि सुशोभिकरणाने लूक बदलणार आहे. नवे देखणे लूक प्राप्त होणार आहे. मात्र सुरू असलेल्या कामामुळे बसस्थानकात असलेली पाण्याची टाकीचे देखील नव्याने होणार असल्याने जुनी टाकी पाडण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाश्यांना बसस्थानकात पिण्याचे पाणी मिळत नाहीये.
विकत घ्यावे लागतेय ‘पाणी’
अंगांची काहिली करणाऱ्या उन्हात बसस्थानकात पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. उन्हाळ्यात उन्हात पाण्याची अधिक आवश्यकता भासते मात्र बसस्थानकात पाणी नसल्याने प्रवाश्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.