पारोळा : येथील मोठे श्री राम मंदिरात अयोध्यातील अभिमंत्रित १०६ अक्षदा कलशाचे शहरासह ग्रामीण भागातील राम भक्तांना वितरीत करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्र की जय..या सारख्या हिंदुत्ववादी घोषणेच्या निनादातून हिंदू अस्मितेचा श्वास प्रभू श्रीराम भक्तीचा जागर करण्यात आला.
हिंदू अस्मितेचा श्वास प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत मंदिर व्हावे, अशी ज्वाजल्य इच्छा करोडो हिंदू बांधवांची होती. यासाठी ५०० वर्ष संघर्ष करावा लागला. या मोठ्या संघर्ष आणि भगीरथ प्रयत्नांतर भव्य श्री राम मंदिर उभारले जात आहे. परिणामी श्री राम हिंदू बांधव आणि श्री राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. गर्भगृहात २२ जानेवारीला प्रभू श्री राम यांची प्रतिष्ठापना होत आहे. त्या पुष्टभुमीवर पारोळा तालुक्यातील १०० गावांत तसेच शहरातील ६ वस्तीश: अभिमंत्रित अक्षदा कलश, निमंत्रण पत्रकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी गोपाल अग्रवाल, ऍड अतुल मोरे, धीरज महाजन, सचिन गुजराथी, रवींद्र पाटील, गोपाल दानेज, भावडू राजपूत, जितेंद्र चौधरी, नरेंद्र साळी, आकाश बडगुजर, श्रीकांत पाठक, देविदास वाणी, पंकज क्षत्रिय, लक्ष्मण महाले, राहुल निकम, ज्ञानेश्वर बुंधे यांच्यासह भक्तगण स्वयंसवेक उपस्थित होते.
शोभायात्रेने वेधले लक्ष
अयोध्यातून अभिमंत्रित होवून आलेल्या अक्षदा कलशाची श्री राम मंदिर ते श्री बालाजी मंदिर अशी शोभा यात्रा काढण्यात आली.१०६ कलशधारी महिला, कलश दर्शनासाठी आलेले हिंदू बांधव रामभक्त या यात्रेत सहभागी झाले. डीजेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामावरील गीताने परिसर भक्तिमय वातावरण निर्माण होऊन भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. दरम्यान माजी खा. ए. टी. पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुरेंद्र बोहरा, डाँ. संभाजीराजे पाटील, प्रवीण दानेज यांनी दर्शन घेत शोभायात्रेत सहभागी झाले.