पार्किंगबाबत मनपाचे उदासीनतेचे धोरण अतिक्रमणास पोषक, जळगावकर म्हणतात ‌‘सांगा आम्ही काय करावे?’

जळगाव : पार्किंगचा प्रश्न केवळ शहरातील महापालिकेसह खासगी व्यापारी संकुलातच आहे असे नाही. रस्त्यांवरही पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. मूळात व्यापारी संकुलांसह रस्त्यावर विक्रेत्यांच्या होणाऱ्या अतिक्रमणाबाबत महापालिकेचे धोरण उदासीनतेचे आहे. हेच धोरण अतिक्रमण वाढीस पोषक ठरत आहे. तत्कालीन नगरपालिकेने आर्थिक स्त्रोत म्हणून शहरात विविध ठिकाणी लहान मोठी व्यापारी संकुले बांधली. रस्त्यावर, मोकळ्या जागेत दुकाने लावणाऱ्या विक्रेत्यांना या संकुलातील गाळे भाडे तत्वावर दिली. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली, तर त्या वेळेपुरता का होईना पार्किगचा प्रश्न सुटून त्यास शिस्त लागली होती.

स्थिती बदलली तरीही ‌‘जैसे थे’
नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांसोबतच आता बहुमजली खासगी व्यापारी संकुले उभी राहत आहेत. व्यापारी संकुलात गाळे घेणाऱ्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने सुरक्ष्ाितरित्या व मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा येणार नाही अशी पार्क करता यावी म्हणून प्रशस्त अशी पार्किगची जागा सोडली होती. त्यानुसार तेथे वाहने पार्क होत होती. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना मार्केटमध्ये अतिक्रमण करण्यास तेव्हा तरी संधी नव्हती. त्यामुळे ते रस्त्यावर अतिक्रमण करत. अशावेळी नगरपालिकेचे वाहन येत त्यांच्यावर कारवाई करत असे. मात्र आता महापालिकेच्या कार्यकाळात या अतिक्रमणांकडे ‌‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष्ा केले जात असल्याचा आरोप नागरिकांसह नगरसेवकांनीच महासभेत केला होता. त्यावरून तत्कालीन अतिक्रमण अधीक्ष्ाकांची चौकशीही सुरू केली होती. या चौकशीचे काय झाले हे अद्याप समोर आलेले नाही आणि येणारही नाही. कारण यातील अनेकजण आता निवृत्त झाले आहेत.

आयुक्तांनीही घेतला अनुभव तरीही…
विद्यमान आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनीही फुले मार्केट, गोलाणी मार्केट यासारख्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुलातील अतिक्रमणाचा व बेशिस्त पार्किंगचा अनुभव घेतला आहे. मात्र याबाबत ठोस तोडगा काढण्याकडे सध्या तरी त्यांनी दूर्लक्ष्ा केल्याचे दिसत आहे.

फेरीवाला धोरणाबाबत पाठपुरावा हवा
शहरात फेरीवाला धोरण राबविण्याबाबतचे धोरण ठरवले जात असले तरी ते कागदावरच आहे. अधिकृत फेरवाल्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मात्र त्यांची बैठक घेत धोरण ठरविणे, हॉकर्स झोन तयार करणे, नो हॉकर्स झोन तयार झालेले नाहीत. त्यामुळे विक्रेते कोठेही अतिक्रमण करत आहेत.

संकुलातील अतिक्रमणाची जबाबदारी दुकानदारांची
महापालिकेच्या मार्केटमधील पार्किंगच्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबतची सर्व जबाबदारी उपायुक्त अविनाश गांगाडे यांनी त्या त्या दुकानदारांवर टाकली होती. संकुलाच्या आतील पार्किगच्या जागेवर अतिक्रमण होत असेल तर त्यास दुकानदारांनी विरोध करावा. त्यासाठी सुरक्ष्ाा रक्ष्ाक नियुक्त करावा. कारण ते मार्केट त्याच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे त्यात होणारे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे आदेशही त्यांनी काढले होते.
कोण पंगा घेणार उपायुक्तांच्या आदेशानुसार जर दुकानदारांनी पार्किगमध्ये होत असलेले अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला व त्यावरून वाद होत प्रकरण मारामारीपर्यत गेले तर…. त्यास कोण जबाबदार. कारण दुकानदार हे भाडेकरू आहेत. पार्किगची जागा या भाडेकरूंची नाही. त्यामुळे तेथे होणाऱ्या अतिक्रमणास मनपाच जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहन लावणाऱ्यांनी जर या विक्रेत्यांना विरोध केलाच तर ते सर्व एकत्र होत विरोध करणाऱ्यास ‌‘प्रसाद’ देत असतात. त्यामुळे कोण पंगा घेणार?रस्त्यावर नाही म्हणून संकुलात येतील जर रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण नसेल आणि तेच जर संकुलात असतील तर आपोआप ग्राहक संकुलात येईल.

अधिकारी वाढले पण कामात सुसूत्रता कधी
कधी नव्हे आता महापालिकेत शासकीय अधिकारी पूर्ण संख्येने आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आता अतिक्रमणाबाबत रोज मोहीम राबवण्याची गरज आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना मनपाच्या संकुलातील रिकामे गाळे भाड्याने देता येतील. त्यामुळे अतिक्रमणही होणार नाही व मनपाला उत्पन्नही मिळेल.याबाबत मनपाने धोरण ठरविणे गरजेचे आहे.

उदासीनतेचे धोरण
नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्याने आता तरी महापालिकेच्या व्यापारी संकुलातील पार्किगच्या जागेवरील व रस्त्यांवरील विक्रेत्यांचे अतिक्रमण निघून तेथे पार्किग करता येईल अशी आशा वाटत होती. मात्र महापालिकेच्या उदासीनतेच्या धोरणामुळे आणि राजकीय हस्तक्ष्ोपामुळे ही आशा सपशेल फोल ठरली आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांची हिंमत वाढत जात आता त्यांनी मनपाच्या सर्वच व्यापारी संकुलातील व संकुलाबाहेरील पार्किगच्या जागेवर अतिक्रमण करून हक्कच दाखवत आहेत.