उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.त्यानी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे,बारामती लोकसभा जिंकण्याबद्दल वक्तव्य केले.पुण्याचे पालकमंत्री पद सोडणे म्हणजे मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला यंदा बारामती लोकसभा जिंकायची आहे.
आता जिंकलो नाहीत तर कधीच जिंकणार नाही. त्यासाठी पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे जाणे महत्वाचे आहे.ते पुढे बोलताना म्हणाले “मी पालकमंत्री नाही हे एका मोठ्या उद्दीष्टासाठी केलेली छोटी तडजोड आहे. आपण हे ठरवायला पाहिजे. की जर देशामध्ये तिसऱ्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायचे असतील. तर एक एक जागा महत्वाची आहे. महाराष्ट्रातील ४८ जागा महत्वाच्या आहेत. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही विचार केला आहे. त्या विचाराचा आपण सन्मान केला पाहिजे.””महाविजय २०२४ ची तयारी करताना. बाकीच्या जागा जिंकता येतील पण आपल्याला बारामती विजयी करायची आहे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले