जळगाव : धानवड व परिसरात प्रतिकूल कालावधीतही या नागरिकांनी मला सदैव साथ लाभली आहे. गावाच्या मागणीनुसार धानवड व परिसरातील विविध विकास कामांसाठी व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे सुशोभीकरणासाठी निधी अपुरा पडू देणार नाही. स्व.रावसाहेब पाटील यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत गावाच्या विकासाठी दिलेल्या वचनपूर्तीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.ते धानवड येथे सुमारे 2 कोटी 37 लक्ष कामांच्या गटार व रस्ते काँक्रीटीकरण भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी कुसुंबा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते उपसरपंच गुळाचा चहाच्या शाखेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी तालुका प्रमुख शिवराज पाटील होते.कुसुंबा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते गुळाच्या चहाच्या शाखेचे उद्घाटन गुळाचा चहा सध्या ठिकठिकाणी हा नवा व्यवसाय सुरू झाल्याचं आपण पाहतोय. गुळाच्या चहाची विक्री करताना, चहा प्रेमींना दुकानमालक गुळाचे फायदेही पटवून देतायेत. अलीकडे साखरेपेक्षा गुळाचा भाव अधिक वाढू लागलाय. अशाच पद्धतीने चिंचोली येथील निवृत्ती वाघ यांनी कुसुंबा येथे श्रीगोंदा येथील
धानवड येथे विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन
धानवड येथे शासनाच्या बजेट अंतर्गत धानवड गावाच्या पुलापासून ते जिल्हा परिषद मराठी शाळे पर्यंत 800 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण व रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावाजवळ काँक्रीट गटार बांधकाम तसेच चिंचोली गावाजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण व रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावाजवळ काँक्रीट गटार बांधकामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 2 कोटी 37 लक्ष निधी मंजूर केले असून आज जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सदर रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. धानवड ते धानवड तांडा या रस्त्याच्या कामासाठीही 60 लक्ष निधी तांड्यावरील 4 शाळा दुरुस्ठीसाठी गौण खनिज अंतर्गत 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.