पालकमंत्री: शिवसेनाप्रमुखांचे विचार म्हणजे संस्काराची,विकासाची शिदोरी

पाळधी, ता.धरणगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदरांजली अर्पण केली.

या हिंदुस्थानात दोन हिंदुहृदयसम्राट झाले. त्यातील एक सावरकर होते आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे या दोन्ही हिंदुहृदयसम्राटांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मनापासून इच्छा आहे.  शिवसेनाप्रमुखांच्या जाज्वल्य विचारांना प्रमाण मानून आपण एक नेता, एक विचार आणि एक झेंडा हाती घेऊन आजवर वाटचाल केली असून भविष्यातही हा समाजकारणाचा वसा जोपासणार असून शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे संस्काराची व विकासाची शिदोरी  असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.17 रोजी शिवसेनाप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिन. दरवर्षी 17 नोव्हेंबर रोजी राज्यभरातून लक्षावधी शिवसैनिक शिवतीर्थावर वंदन करण्यासाठी दाखल होत असतात. जिल्ह्याचे  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू व मराठी जनतेच्या हितासाठी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडला आहे. आमच्यासाठी बाळासाहेबांचा विचार प्रेरणादायी असून, पुढेही  आमची वाटचाल अशीच सुरू राहील. तसेच हाच विचार प्रगतीचा विचार असून, यात समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी मिळत आहे.  शिवसेना प्रमुखांच्या जाज्वल्य विचारांना प्रमाण मानून आपण एक नेता एक विचार आणि एक झेंडा हाती घेऊन आजवर वाटचाल केली असून भविष्यातही हा समाजकाराणाचा वसा जोपासणार आहे.  शिवसेनाप्रमुख बाळा साहेबांचे विचार हे चिरंतन चालणारे विचार आहेत. पक्ष, संघटना, माणसे येत जात असतात. पण विचार कायम राहतात. विचार कधी मरत नाहीत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचे विचार आबाधीत राहणार आहेत. या हिंदुस्थानात  दोन हिंदुहृदयसम्राट झाले. त्यातील एक सावरकर होते आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे होते, त्यामुळे या दोन्ही हिंदुहृदयसम्राटांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मनापासून इच्छा आहे.