पालकमंत्री : 2 हजार एकरवर साकारणार वीजनिर्मिती प्रकल्प

जळगाव : उद्योग, व्यवसायांना चालना देण्यासाठी व त्यांना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध व्हावी, यासाठी नव्याने 2 हजार 900 एकरवर वीजनिर्मिती प्रकल्प जिल्ह्यासाठी प्रास्तावित करण्यात आल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. खानदेशची संस्कृती, परंपरा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी वारकरी भवन उभारण्यात येत असून त्यासाठी 6 कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले.

खेड्यातील शिक्षण पध्दती व इंग्रजी शाळांबाबत धोरण ठरले पाहिजे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 300 शाळा खोल्या दिल्या. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 500 शाळांना संरक्षण कुंपण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 85 टक्के गावात ग्रामपंचायत कार्यालय आहेत. 15 टक्के ग्रामपंचायतींची कामे देण्यात आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. लव्ह जिहादसारख्या घटना लक्षात घेता त्यासंदर्भातील कायदा व्हायलाच हवा. त्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. जिल्हा रुग्णालयातील सेवा सुविधेत मोठा बदल केल्याचे त्यांनी सांगितले. 185 गावात स्मशानभूमी बांधण्यात आले आहेत.  शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या साठवणूकीसाठी एक गाव एक गोडाऊन अशा पध्दतीने पतसंस्थांनी याची उभारणी करावी. 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात पर्जन्यमान केंद्र उभारले गेले पाहिजे, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी जळगावला आयुक्त कार्यालय व्हावे. जेणेकरून प्रशासनासह जनतेची गौरसोय दूर होईल. तसेच खानदेशातील आमदारांचा खान्देश गट तयार झाला पाहिजे, असा मानस त्यांनी व्यक्त केला.