मुंबई: पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या चिमुकल्या विद्याथ्यारचे वर्ग आता सकाळी ९ वाजतानंतर भरविण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यासंदर्भातला शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला आधुनिक युगातील बदललेल्या जीवनशैलीमुळे पालक आणि पाल्य रात्री उशिरा झोपत आहेत आणि सकाळी शाळा असल्याने पालक आणि पाल्यांना लवकर उठावे लागत आहे.
झोप पूर्ण न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. विशेष म्हणजे, राज्यपालांनी शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबतची सूचना ५ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या कार्यक्रम ाप्रसंगी केलेल्या भाषणातून केली होती. त्याअनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शाळांची वेळ बदलण्याबाबत अभ्यास करण्यात आला.
यात राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, पालक, प्रशासनातील अधिकारी आदींचे अभिप्राय नोंदविण्यात आले. शासन परिपत्रक जारी शिवाय गुगल लिंगवरून सर्वसाम ान्यांचे अभिप्राय मागविण्यात आले. सवरकष अभ्यासाअंती आलेल्या शिफारशी विचारात घेऊन, शासन पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपयरतच्या विद्याथ्यारचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविण्याबाबतच्या निर्णयावर पोहचले. त्यामुळे आता सर्व शाळांना आपल्या शाळा भरवण्याचा नियोजन करावे लागणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे सवारच्याच झोपेच्या वेळा बदलल्या असून, रात्री उशिरा झोपण्याकडे कल वाढलेला आहे. रात्री उशिरा झोपण्याच्या संस्कृतीमुळे शाळांची वेळ सकाळची असणे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू लागली आहे, असे राज्यपालांनी म्हटले होते.