---Advertisement---

पिंपरी चिंचवड हादरलं! स्वतःच्या मुलीचा खून करून बापानेही घेतला गळफास

by team
---Advertisement---

पिंपरी चिंचवड : सात वर्षांच्‍या मुलीचा खून करून वडिलांनीही गळफास घेत आत्‍महत्‍या केल्याची घटना गुरूनानकनगर, थेरगाव येथे मंगळवारी ( १९ मार्च) पहाटे उघडकीस आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बेदरे यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) असे खून झालेल्‍या मुलीचे नाव आहे. तर तिचे वडिल भाऊसाहेब भानुदार बेदरे (वय ४५) यांनी आत्‍महत्‍या केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, भाऊसाहेब यांची पत्‍नी काही कारणानिमित्‍त माहेरी गेली होती. भाऊसाहेब यांना फोन करून आपल्‍याला नेण्‍यासाठी या, असे सांगितले. मात्र, भाऊसाहेब हे आलेच नाहीत. त्‍यामुळे त्‍या स्‍वतः घरी आल्‍या.  त्‍यानंतर भाऊसाहेब यांच्‍या पत्‍नीने घरातील त्‍यांच्‍या खोलीत जाऊन पाहिले असता पतीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याचे दिसून आले. त्‍यानंतर तिने मुलीच्‍या डोक्‍यावरील चादर उघडून पाहिली असता तिचाही मृत्यू झाल्याचं दिसलं. हे पाहताच भाऊसाहेब यांच्‍या पत्‍नीने हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून जमा झालेल्‍या नागरिकांनी त्‍वरीत पोलिसांना कळवले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment