पितृ पक्षात पहिले श्राद्ध केव्हा केले जाईल? जाणून घ्या सविस्तर….

पितृ पक्ष २ ० २ ४ : आश्विन महिन्यातील पितृ पक्षातील सोळा दिवस आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. पितृपक्षात केलेल्या श्राद्धाने पितरांचे ऋण निघून जाते आणि पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो.

या काळात दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान केले जाते. पितरांच्या मृत्युतिथीला श्राद्ध करावे. घरातील किंवा नात्यातील मृत पावलेल्यांची तारीख माहित नसल्यास सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध विधी करता येते . या वर्षी पितृ पक्षात पहिले श्राद्ध केव्हा केले जाईल, जाणून घ्या त्याचे महत्त्व.

पितृ पक्ष सुरू होतो – १ ७ सप्टेंबर २ ० २ ४ (भाद्रपद पौर्णिमा)

पितृ पक्षाची समाप्ती – २ ऑक्टोबर २ ० २ ४ (सर्व पितृ अमावस्या)

पितृ पक्षातील पहिले श्राद्ध कधी असते?
१ ७ सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पक्ष सुरू होत असला तरी या दिवशी श्राद्ध केले जाणार नाही. पौर्णिमेला ऋषीमुनींना तर्पण अर्पण करण्याचा विधी आहे. पौर्णिमा तिथीच्या श्राद्धाला ऋषी तर्पण असेही म्हणतात. पितृ पक्षात प्रतिपदा तिथीपासून श्राद्ध कर्माची कामे होतात. अशा स्थितीत यावर्षी पहिले श्राद्ध १ ८ सप्टेंबर रोजी प्रतिपदा तिथीला होणार आहे.

वर्षभरात आपण श्राद्ध कधी करू शकतो?
वर्षात १ २ अमावस्या, १ २ संक्रांती, पितृ पक्षाचे १ २ दिवस असे एकूण 96 दिवस असतात ज्यात श्राद्ध करता येते. श्राद्ध पक्षातही तिथी लक्षात न राहिल्यामुळे जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करू शकत नसाल तर सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केल्याने तुमच्या पितरांना समाधान मिळते.

शास्त्रानुसार ३ ६ ५ दिवस श्राद्ध करण्याची तरतूद आहे, जे रोज श्राद्ध करतात त्यांच्यासाठी नित्य श्राद्धाचा नियम आहे. वेळेअभावी रोज श्राद्ध करणे कठीण जाते, म्हणून या विशेष तिथी सांगितल्या आहेत.

पितृ पक्ष २ ० २ ४ तिथी

पौर्णिमा श्राद्ध – १७ सप्टेंबर २०२४

प्रतिपदा श्राद्ध – १ ८ सप्टेंबर२ ० २ ४

द्वितीया श्राद्ध – १९ सप्टेंबर २०२४

तृतीया श्राद्ध – २ ० सप्टेंबर २ ० २ ४

चतुर्थी श्राद्ध – २ ० सप्टेंबर २ ० २ ४

महाभरणी – २ १ सप्टेंबर २ ० २ ४

पंचमी श्राद्ध – २ २ सप्टेंबर २ ० २ ४

षष्ठी श्राद्ध – २ ३ सप्टेंबर २ ० २ ४

सप्तमी श्राद्ध – २ ३ सप्टेंबर २ ० २४

अष्टमी श्राद्ध – २ ४ सप्टेंबर २ ० २ ४
नवमी श्राद्ध -२ ५ सप्टेंबर २ ० २ ४
दशमी श्राद्ध – २ ६ सप्टेंबर २ ० २ ४
एकादशी श्राद्ध – २ ७ सप्टेंबर २ ० २ ४
द्वादशी श्राद्ध – २९ सप्टेंबर २०२४
माघ श्राद्ध – २९ सप्टेंबर २०२४
त्रयोदशी श्राद्ध – ३ ० सप्टेंबर २ ० २ ४
चतुर्दशी श्राद्ध – १ ऑक्टोबर २०२४
सर्वपित्री अमावस्या – २ ऑक्टोबर २०२४