पीपीएफ खातेधारकांसाठी मोठी बातमी ! ऑक्टोबरपासून योजनेत तीन मोठे बदल,’या’ खात्यांवर मिळणार नाही व्याज

PPF Rule Change: पब्लिक प्रोव्हीडेंड फंड (PPF) हा गुंतवणूक दरांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. छोटी किंवा मोठी हवी तशी गुंतवणूक आणि अधिक व्याजदर मिळत असल्यामुळे पीपीएफ योजना लोकप्रिय ठरली आहे. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स अंतर्गत चालवली जाणारी पब्लिक प्रोविडेंड फंड (PPF) या योजनेबाबत अर्थ मंत्रालयाकडून एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे. ही एक अशी योजना आहे, जी 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते आणि दीर्घ मुदतीत तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. या योजनेत आता तीन महत्त्वाचे आणि मोठे बदल केले जाणार आहेत. हे बदल 1 ऑक्टोबर 2024 पासून म्हणजेच, पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत.

21 ऑगस्ट 2024 रोजी अर्थमंत्रालयाने या योजनेसंदर्भात नवीन गाइडलाइन जारी केले आहेत. त्यानुसार पीपीएफसाठी तीन नवीन नियम आणले आहेत. तसेच सुकन्‍या समृद्धी योजना आणि नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट या योजनेत बदल केले आहे. नवीन गाइडलाइनमध्ये अल्पवयीन व्यक्ती आणि एनआरआय संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

पहिला नियम : अल्पवयीन व्यक्तीच्या नावं PPF खातं उघडता येणार
एखादी व्यक्ती जर अल्पवयीन असेल, तरीदेखील त्यांच्या नावानं पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेसाठी खातं उघडता येणार आहे. म्हणजेच, खातं उघडल्यानंतर PPF व्याज व्यक्ती 18 वर्षांची होईपर्यंत दिलं जाईल. ज्या तारखेला अल्पवयीन व्यक्ती प्रौढ होईल, त्या तारखेपासून मॅच्युरिटी कालावधी मोजला जाईल. म्हणजेच, ज्या तारखेपासून व्यक्ती खातं उघडण्यास पात्र होते, त्या दिवसापासून मॅच्युरिटीचा कालावधी गणला जाणार.

दुसरा नियम : एकापेक्षा जास्त PPF अकाउंट
जर जमा केलेली रक्कम प्रत्येक वर्षासाठी लागू असलेल्या कमाल मर्यादेत असेल, तर प्रायमरी अकाउंटवर योजनेनुसार, व्याज आकारलं जाईल. जर प्राथमिक खातं दरवर्षी अंदाजे गुंतवणूक मर्यादेत राहीलं, तर दुसऱ्या खात्यातील शिल्लक पहिल्या खात्यात विलीन केली जाईल. विलीनीकरणानंतर, प्रायमरी अकाउंट वर प्रचलित योजना दर किंवा व्याज दर मिळत राहणार. विलीनीकरणानंतर, प्रायमरी अकाउंटवर प्रचलित योजना दर किंवा व्याज खात्यावर मिळत राहणार. प्राथमिक आणि दुय्यम खात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अतिरिक्त खात्यावर खातं उघडण्याच्या तारखेपासून शून्य टक्के व्याजदर मिळेल. याचा अर्थ एकापेक्षा जास्त खाती उघडली तरी पीपीएफ योजनेंतर्गत व्याज एकाच खात्यावर मिळेल.

तिसरा नियम : NRI द्वारे PPF खात्याचा विस्तार
PPF, 1968 अंतर्गत फक्त सक्रिय NRI PPF खाती उघडली जातात, जिथे खातेदाराची निवासी स्थिती फॉर्म H मध्ये विशेषतः विचारली जात नाही. अकाउंट होल्डर्स (भारतीय नागरिक जे खाते उघडण्याच्या कालावधीत NRI झाले आहेत) यांना POSA दरानं 30 सप्टेंबर 2024 पर्यंत व्याज दिलं जाईल. यानंतर 1 ऑक्टोबरपासून या खात्यांवर शून्य व्याजदर लागू होईल