पुढचा मुख्यमंत्री केवळ संख्याबळांवर होणार नाही, तर…,काय म्हणाले फडणवीस ?

मुंबई: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढवणार आहेत. एका पुरस्कार सोहळ्यातील कार्यक्रमात, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात, तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सर्व नेते आणि कार्यकर्ते आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याचं म्हणतात. ही गोष्ट संख्याबळावर ठरत असली तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असे उत्तर दिले.

पुढे ते म्हणाले, महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढवतील तसेच विधानसभा निवडणुकीनंतर केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील. शेवटी माझा नेता मोठा झाला पाहीजे हे कार्यकर्त्यांचे मोटिवेशन असते, असे फडणवीस म्हणाले.

तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा केवळ संख्याबळाच्या जोरावर होणार नाही. तर याबाबतचा निर्णय हा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींमार्फत घेतला जाईल, असं स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिलं आहे.