---Advertisement---

पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

---Advertisement---

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरु झाल्यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

आज मंगळवारी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर बुधवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.तसेच पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

गुरुवारपासून थंडी वाढणार
दरम्यान, राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे. 11 जानेवारीपासून हे ढगाळ वातावरण निवळेल आणि थंडी पुन्हा परतण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. मात्र महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे किमान व कमाल तापमान सरासरी इतकेच हाेते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment