मुंबई : उशीरा आलेला मान्सून आता राज्यात सर्वदूर पसरत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखवला आहे. मागील दोन दिवसात मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.
वामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या 4-5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस कसा असेल पाऊस?
28 जून – हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पाऊस कसा असेल याचा अंदाज दिला आहे. उद्या म्हणजे 28 जून रोजी मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
29 जून रोजी रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर, विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, नाशिक जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
30 जून रोजी रायगड जिल्हात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात यलो अलर्ट देण्यात आला आहे.