पुढील 48 तासांत राज्यात अवकाळीचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यात कशी राहणार स्थिती? जाणून घ्या

पुणे । राज्यवार पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढवलं असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन हिवाळयात अनेक ठिकाणी पावसाचा सरी कोसळल्या. आता पुढील 48 तासांत राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. मात्र पावसामुळे हवेत गारठा जाणवत आहे.

पुढील काही दिवसांमध्ये आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील ‘या’ भागांत पावसाचा इशारा
आज आणि उद्या कोकणात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर सांगली आणि कोल्हापूरमध्येही पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, अहमदनगरमध्येही आज आणि उद्या हपाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विजाच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात अशी राहणार स्थिती?
जळगाव जिल्ह्यात आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव शहरात शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कायम होता. ९ जानेवारीपर्यंत तापमान १६ ते १९ सेल्शिअम दरम्यान राहण्याची शक्यता असून या काळात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.