पुणे पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलांमधील क्रूरता पाहून पोलीसांनाही बसला धक्का, नेमकं काय घडलं ?

चाकण : विद्देच माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात नेमकं चाललंय तरी काय ? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. पुणे पोलिसांकडून ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यानंतरही कोयते हल्ले, चोरी, दरोडो आणि मारहाण असे प्रकार घडत आहे. दोन दिवसापूर्वीच अभिनेते रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर पुण्यातील वेताळ टेकडीवर ड्रग्स सेवन करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा व्हिडिओ टाकला होता.

असाच काहीसा प्रकार पिंपरी-चिंचवड मधील चाकण परिसरात घडला आहे. तीन अल्पवयीन मुले दारु पित बसले होते. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ शाब्दिक वाद झाला. मग त्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारला. त्याची हत्या केली. हे करत असतांना तिसरा त्याचा विडिओ बनवत होता. खून केल्या नंतर त्यांनी तो विडिओ स्टेटसला लावला. हा सर्व प्रकार पाहून पोलीसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हा प्रकार सोमवारी रात्री ११ च्या सुमारास चाकण परिसरात घडला. या हत्याप्रकरणातील आरोपी 17 वर्षीय आहेत. हत्या झालेल्या आणि हत्या करणाऱ्या दोघांवर याआधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही अल्पवयीन मुलांना चाकण पोलिसांनी अटक केलीय. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.