---Advertisement---

पुणे मनसे : मनसेच्या गणेश नाईकवाडे यांच्या बॅनरची सर्वत्र चर्चा

by team
---Advertisement---

पुणे :  मनसेचे पूण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर पुण्यात मनसे खिळखिळी झाली असं बोललं जात होतं. त्यात कात्रज हा वसंत मोरेंमुळे मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र आता मनसेचे कबमॅकसाठी  पदाधिकाऱ्यांकडून  कंबर कसल्याचं दिसत आहे.  मनसेने कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी थेट वसंत मोरेंना इशारा देणारे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे आता मनसे पुण्यात सक्रिय झाल्याचं दिसत आहे.

कात्रज मनसेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहिल, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. मनसेचे पुणे शहर संघटक गणेश नाईकवाडे यांनी हा बॅनर कात्रजमधील विविध चौकांमध्ये लावला आहे. या बॅनरवर मनसेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकऱ्यांचे फोटो लावले आहेत. मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेने आता आपला जम बसवायला सुरुवात केली आहे. त्यातच येत्या काळात मनसे एकत्र येऊन कदाचित वसंत मोरेंच्या विरोधात उभी ठाकणार असल्याचं या बॅनरवरुन दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment