जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा यावर्षीचा 300 वा पुण्यस्मरण सोहळा हा साजरा करण्यासाठी जळगाव महानगरतर्फे केमिस्ट भवन येथे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केला होता. सदरील कार्यक्रमांमध्ये अखिल भारतीय सह संघटन मंत्री विनायकराव देशपांडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रभू श्रीराम यांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली.
आपल्या व्याख्यानामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे संपूर्ण जीवनपट अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मांडले. त्यांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष तसेच महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण जे आधीच्या काळात केलं जात होतं त्याचे उदाहरण देऊन अतिशय छान अशा शब्दात मांडणी केली. तसेच अहिल्यामाता या एक उत्कृष्ट राज्यकर्त्या होत्या एक महिला असून त्यांनी संपूर्ण भारतात शेकडो हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार केला तसेच गावोगावी महिला सक्षमीकरण सबलीकरण केलं त्यांचा कार्याचा उजाळा या व्याख्यानांमधून त्यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष सोनवणे होते. ते अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी तालुका जामखेड जिल्हा नगर येथे जे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. आपल्या भाषणामध्ये त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे विशेष अभिनंदन केले. संपूर्ण भारतात विश्व हिंदू परिषद हे अहिल्या माता होळकर यांचा त्रीशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला मंचावर विजया पांडे, डॉ. श्रीराज महाजन, संजय व्यास, आनंद मुकुंद व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, महानगर अध्यक्ष डॉ. मनीष चौधरी तसेच आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते
प्रास्ताविक ऍड. शिल्पा रावेरकर स्वागत व परिचय भूषण क्षत्रिय व आभार पवन झुंजारराव यांनी मानले. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री गणेश मोकाशे, विभाग मंत्री देवेंद्र भावसार, विभाग संयोजक राकेश लोहार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, भरत कोळी, यश पांडे, ललित खडके, मनोज बाविस्कर, दीपक दाभाडे उपस्थित होते.