पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद्यांनी घेतले होते बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण; NIA ची धक्कादायक माहिती

पुणे : ISIS शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी NIA बुधवार 13 मार्च रोजी पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले. मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. पुण्यातील कोंढवा येथील एका घरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण संशयित दहशतवाद्यांनी घेतले. मागच्या वर्षी ज्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता, त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. NIA च्या तपासात ही खळबळजनक माहिती उघड झाली.

सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. पुणे आणि महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व सामील होते. या आरोपींनी कोंढवा भागातील घरात राहू बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. त्यांनी आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.