चाळीसगाव : पुण्यातील कोयता गंगच्या पसार सदस्यासह गावठी पिस्टल बाळगणाऱ्या चाळीसगावातील पिता-पुत्रांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील, दीपक भटू पाटील अशी अटकेतील पिता-पुत्राची तर निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी निक्या (रा. लक्ष्मी नगर येखडा, पुणे) असे शस्त्र पुरवणाऱ्या अटकेतील संशयिताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासात
असताना शहर पोलिसांना संशयित निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी हा सराईत गुन्हेगार पुण्यातील येरवडा येथील कोयता गँगचा सदस्य चाळीसगावात आल्याची माहिती मिळाली. संशयिताने २५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर येरवडा, पुणे भागात हातात कोयते, तलवारी व दगड घेवुन सुमारे ३० ते ३५ वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केल्याने त्याच्याविरोधात येरवडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. हा गुन्हा घडत्यापासून निखील शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता. या संशयिताला अटक केल्यानंतर ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील, दीपक भटू पाटील यांना गावठी पिस्टलासह पकडण्यात आले. संशयिताने हे शस्त्र बंडी निक्या याच्याकडून २१ हजार ५०० रुपयांमध्ये खरेदी केल्याची कबुली दिली.
अटकेतील तिघांविरुद्ध चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम यांनी केली कारवाई ही कारवाई चाळीसगाव शहरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, दीपक पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, योगेश बेलदार, विनोद भोई, नितीश पाटील, नीलेश पाटील, नंदकिशोर महाजन, मनोज चव्हाण, विमल सानप आदींच्या पथकाने केली. ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमा गुन्हा नोद करण्यात आला आ पुढील तपास पोलीस उपनिरीक्ष योगेश माळी व पोलीस कर्मचा कल्पेश पगार करत आहेत.