पुण्यात 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गडण्याचा प्रयत्न,30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली माती

by team

---Advertisement---

 

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात ३०७ कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधीत तरुणीने आणि तिच्या आईने केला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या २५ ते ३० जणांनी जेसीबीच्या सहाय्याने अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनी आणि तिच्या घरच्यांनी केला आहे.

तरुणीने केलेल्या आरोपानुसार, नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचं दिसतंय. तरुणीने घडलेल्या घटनेबाबत वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणात १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

काय आहे हे प्रकरण?
२००६ मधल्या प्रकरणात तत्कालीन कलेक्टर साहेबांनी एक जागा भूसंपादन केले. मात्र, त्या जागेचा मोबदला या पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाला नाहीये. त्यामुळं त्यांनी जागेवरील ताबा सोडण्यास नाकार दिला. तसंच, ज्यांनी ही जागा घेतली आहे त्या जागेच्या मालकाने बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी २२ वर्षीय तरुणीच्या गाडल्याचा प्रकार केला. तसंच, तरुणीच्या अंगावर ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने माती टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, जमिनीचा ताबा घेण्यासाठी मुंबईवरुन गुंड मागवल्याचाही प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टर आणि जेसीबीदेखील जप्त करण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---