---Advertisement---

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

by team
---Advertisement---

Pulwama Attack : पुलवामा हल्ला हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस म्हणून स्मरणात आहे. याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी मोठी दहशतवादी घटना घडवली होती. ज्यामध्ये देशाचे 40 जवान शहीद झाले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता 14 फेब्रुवारी रोजी या दहशतवादी घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. हा हल्ला भारतावरील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता.

पुलवामा दहशतवादी हल्याला आज 5 वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याने म्हटले आहे की, मी पुलवामामध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. देशासाठी त्यांची सेवा आणि त्याग सदैव स्मरणात राहील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment