पृथ्वीवरुन पुरुष कायमचे विलुप्त होणार, फक्त मुलीं उत्पत्ती कशी झाली याचा शोध घेण्यासाठी अनेक वर्ष संशोधन करावे लागले. पण या पृथ्वीवरुन मानसाचे जीवनच नष्ट झाले तर काय होईल. याची भीती वैज्ञानिकांना सतावते आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे या पृथ्वीवर पुरुषांचा जन्मच होणे कमी होऊन जाईल. काय समोर आले आहे या संशोधनातून जाणून घ्या सविस्तर.
स्त्रीच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाचे लिंग म्हणजेच तो मुलगा असेल की मुलगी हे त्याच्या पालकांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. स्त्रीच्या शरीरात दोन X गुणसूत्र असतात आणि पुरुषाच्या शरीरात एक X आणि एक Y गुणसूत्र असतात. जेव्हा पुरुष आणि स्त्रीचे XX गुणसूत्र एकत्र येतात तेव्हा मुलगी जन्माला येते आणि जेव्हा XY गुणसूत्र एकत्र होतात तेव्हा मुलगा जन्माला येतो. म्हणजे मुलगा होण्यासाठी Y गुणसूत्र असणे आवश्यक आहे. पण जर भविष्यात Y गुणसूत्रच नष्ट झाले तर काय होईल अशी चिंता शास्त्रज्ञांनाना सतावते आहे. असे झाल्यास मुलेच जन्माला येणार नाहीत, फक्त मुलीच जन्माला येतील. असाच धोका एका नवीन संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये वाय गुणसूत्रे कमी होत असल्याचा दावा केला जात आहे.
Y क्रोमोसोमची घसरण
सायन्स अलर्टच्या अहवालानुसार, या संशोधनात असे म्हटले आहे की, मानवी Y क्रोमोसोम कमी होत चालले आहे आणि भविष्यात पूर्णपणे नाहीसे देखील होण्याची शक्यता आहे. मात्र, ते संपायला लाखो वर्षे लागतील. जर मनुष्य Y ला पर्याय म्हणून नवीन जनुक विकसित करू शकला नाही आणि Y क्रोमोसोमची घसरण चालूच राहिली तर पृथ्वीवरील जीवन नाहीसे होऊ शकते. प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधामुळे नवीन जनुक विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे. हे एका पर्यायी शक्यतेकडे निर्देश करते, जे म्हणते की मानव एक नवीन लिंग-निर्धारित जनुक विकसित करू शकतो. पण ते इतके सरळ नाही आणि त्याचा विकास देखील अनेक धोके घेऊन येईल. म्हणजे आता त्याचा पर्याय म्हणून विचार करणे फार घाईचे आहे.
Y गुणसूत्र मानवी लिंग कसे ठरवते?
पुरुषांमध्ये एक X आणि एक Y गुणसूत्र असते. X मध्ये सुमारे ९०० जीन्स आहेत, तर Y मध्ये सुमारे ५५ जीन्स असतात. भरपूर नॉन-कोडिंग DNA आहेत. Y क्रोमोसोम एक महत्त्वपूर्ण जनुक असतो जो गर्भामध्ये पुरुषांच्या विकासास सुरुवात करतो. गर्भधारणेच्या १२ आठवड्यांनंतर हे मास्टर जनुक इतर जनुकांमध्ये बदलते. हे गर्भामध्ये पुरुष संप्रेरक तयार करते ज्यामुळे बाळाचा मुलगा म्हणून विकास होतो.
- दोन गुणसूत्रांमधील विषमता वाढत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. गेल्या १६६ दशलक्ष वर्षांमध्ये Y गुणसूत्राने ९००-५५ सक्रिय जीन्स गमावले आहेत. हे दर दशलक्ष वर्षांमध्ये पाच जनुकांचे नुकसान आहे. या दराने शेवटची ५५ जीन्स संपण्यासाठी ११ दशलक्ष वर्ष लागतील. Y क्रोमोसोम कमी झाल्याने शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.
Y क्रोमोसोमच्या घसरण पाहता वैज्ञानिकांनी अशा दोन उंदरांवर संशोधन केले. जे Y गुणसूत्र गमावल्यानंतरही जिवंत आहेत. पूर्व युरोप आणि जपानच्या उंदरांमध्ये, अशा प्रजाती आहेत ज्यांचे गुणसूत्र आणि SRY पूर्णपणे नाहीसे झाले आहेत. अशा जातींमध्ये एक्स गुणसूत्र दोन्ही लिंगांसाठी कार्यक्षम असते.
संशोधनात, कुरोइवाच्या टीमचे म्हणणे आहे की मानवी Y क्रोमोसोम गायब झाल्यामुळे आपल्या भविष्याविषयी अनुमानांना चालना मिळाली आहे. हे देखील शक्य आहे की आजपासून ११ दशलक्ष वर्षांनंतर पृथ्वीवर एकही माणूस राहणार नाही. कारण पुनरुत्पादनासाठी शुक्राणूंची गरज असते. याचा अर्थ यासाठी पुरुषांचे असणे आवश्यक आहे. हे स्पष्ट आहे की Y गुणसूत्राच्या समाप्तीमुळे मानवजातीच्या विलुप्ततेची घोषणा होऊ शकते.