पेटीएमचा 52 आठवड्यांचा नवा नीचांक, गुंतवणूकदारांचे २६ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान

Paytm Share Price: One97 कम्युनिकेशन्सची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबी) वर निर्बंध लावल्यानंतर , आरबीआयने म्हटले होते की नियमांचे सतत उल्लंघन केल्यामुळे कंपनीविरुद्ध कारवाई करणे आवश्यक झाले आहे. तपासात केवायसीमध्ये मोठी अनियमितता आढळली, ज्यामुळे ग्राहक, ठेवीदार, वॉलेट धारकांना गंभीर जोखमीचा सामना करावा लागला. तपासात असे आढळून आले की हजारो प्रकरणांमध्ये एकच पॅन हजार हून अधिक ग्राहकांशी जोडला गेला होता आणि काही प्रकरणांमध्ये 1,000 हून अधिक ग्राहक एकाच पॅन कार्डशी जोडले गेले होते. त्यामुळे नियामकाला मनी लाँड्रिंगचाही संशय आला.

RBI ने PPB ला 29 फेब्रुवारीनंतर ग्राहकांच्या खाती, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, वॉलेट्स, फास्टॅग आणि NCMC कार्ड्समधील व्याज, कॅशबॅक किंवा रिफंड व्यतिरिक्त ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप स्वीकारणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या 10 दिवसांत मोठी घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बीएसईवर 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज कंपनीचे शेअर 350 रुपयांच्या खाली गेले आहेत. जो 52 आठवड्यांचा नवा नीचांक आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 55 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. याशिवाय गुंतवणूकदारांचे २६ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.