पेपर देण्यासाठी गेली तरुणी… कुटुंबीय पोहचले पोलिसांत; काय घडलं ?

जळगाव : सध्या बारावीचे पेपर सुरु असून, पेपर देण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलीचे शहरातील एका महिला महाविद्यालयात बारावीचे पेपर सुरू आहे. शुक्रवारी १५ मार्च रोजी दुपारी ती पेपर देण्यासाठी घरातून निघून गेली.

दरम्यान सायंकाळी ६ वाजता तिचा पेपर सुटला. त्यानंतर संशयित आरोपी सागर चुनीलाल बाविस्कर रा. जळगाव याने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीसात सागर बाविस्कर विरोधात तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपानि मिरा देशमुख हे करीत आहे.