---Advertisement---
सोयगाव: पैशाअभावी १९ वर्षाच्या मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सोयगावात बापलेकीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. नगर पंचायत कर्मचारी असलेल्या बापाला निलंबित काळातील वेतन न दिल्याने दोन जीव गेल्याचा आरोप करीत मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर कारवाई करून मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीला तत्काळ नोकरी द्या या मागणीसाठी संतप्त नातेवाईक व नागरिकांनी मृतदेह तीन तास नगर पंचायत कार्यालयात ठेवून आक्रोश केला. दीपक प्रल्हाद राऊत असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक राऊत वैष्णवी राऊत होते.
त्यांची १९ वर्षीय मुलगी वैष्णवी हिचा ७ रोजी जळगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. घरी आल्यावर रात्री घरातील लोकं झोपी जाताच दीड ते दोनच्या दरम्यान गळफास लावून दीपकने आत्महत्या केली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर संतप्त झालेल्या नातेवाईक व नागरिकांनी मृतदेह नगर पंचायत कार्यालयाच्या दारात आणून ठेवला. दोन्ही मृत्यूस जबाबदार मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार करण्यात आली. तालुका प्रशासनाच्या
मुख्याधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
दीपक यास फेब्रुवारी महिन्यात निलंबित केले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यापासून त्यास पगार नव्हता. त्यातच मुलीला पोटात त्रास होऊ लागला. निलंबन काळातील अर्धा पगार द्या याविषयी२६ मार्च रोजी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे विनंती अर्ज केला होता. तरीही वेतन मिळाले नाही. पोटाचा त्रास वाढल्यामुळे २ एप्रिल रोजी रात्री मुलीला जळगाव येथील सामान्य रुग्णालयवत भरती केले. ३ एप्रिल रोजी ऑपरेशन झाल्यावर मुलगी कोमात गेली आणि रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.
दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. आपल्याजवळ पैसे नव्हते म्हणून आपली मुलगी गेली, या अपराधी भावनेतून रात्री सर्वजण झोपी गेल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगी आणि लगेच वडील गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संतप्त नातेवाईक व नागरिकांनी दीपकचा मृतदेह नगर पंचायत च्या दारात आणून ठेवला. वेतन थांबवून आर्थिक अडचणीत आणणाऱ्या मुख्याधिकारी तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व दीपकच्या पत्नीला नोकरी द्या या मागणीसाठी आक्रोश करण्यात आला