पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश, दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रभाव असलेल्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रभाव असलेल्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या मॉड्यूलचे नेतृत्व रांचीचे रहिवासी डॉ. इश्तियाक करत होते.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रभाव असलेल्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांसह दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करून या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या मॉड्यूलचे नेतृत्व रांचीचे रहिवासी डॉ. इश्तियाक करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मॉड्युल देशात अनेक दहशतवादी घटना घडवण्याची योजना आखत होते. मॉड्यूलच्या सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले.

शस्त्रे वापरण्याच्या प्रशिक्षणादरम्यान पोलिसांनी भिवडी, राजस्थान येथून ६ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. याशिवाय झारखंड आणि उत्तर प्रदेशातील आठ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दिल्ली पोलिसांनी या संयुक्त कारवाईत शस्त्र, दारूगोळा, साहित्य आदी जप्त केले आहे. अजूनही छापेमारी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली असून देशातील दहशतवादी कारवाया रोखण्यात त्यांना यश आले आहे.