पोलीस ताफ्यात तब्बल ‘इतक्या’ गाड्या दाखल! १४ महिला ड्रायव्हर, अजित पवार म्हणाले, ‘महिलांनाही संधी देण्याचं..’

बारामती:  मध्ये नुकताच विद्या प्रतिष्ठान संस्थेत नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, इत्यादी नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना अजित राज्यातील महिलांना संधी देण्याचे काम तसेच अनेकांना रोजगार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.

या वेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांनी यावेळी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उशिर होणार होता. पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल झाल्या आहेत. याचा शुभारंभ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मी केला. तिथे ३९ वाहनांमध्ये जे ड्रायव्हर होते, त्याच्यात १४ महिला होत्या. सर्वांत चांगलं काम त्यांचं सुरू होतं. महिलांना संधी देण्याचं काम महायुती सरकार करत आहे असंही ते यावेळी म्हणाले.