तिरंगी रंगाची स्विट डिश..
कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, भारतातील जवळपास प्रत्येक घरांत काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. आज २६ जानेवारी,प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही दुधापासून बनवलेला हा खास पदार्थ बनवू शकता. यासाठी दूध उकळून तीन ठिकाणी वेगळे ठेवावे. एका भांड्यात ऑरेंज जिलेटिन रंग, दुसऱ्यामध्ये किवी आणि तिसऱ्यामध्ये व्हॅनिला फ्लेवर मिसळा. यानंतर, मध्यम आचेवर पॅनमध्ये जाड मलई आणि साखर चांगली वितळवा. आता ही क्रीम तीन ठिकाणी वेगवेगळी ठेवा. आता वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी क्रीम मिसळा. हे सर्व मिक्स केल्यानंतर, बेसला साच्यात बनवण्यासाठी, सर्वात आधी किवीपासून तयार केलेला हिरवा बेस टाका, त्यानंतर 10 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. 10 मिनिटांनंतर, ते बाहेर काढा आणि त्यावर व्हॅनिला मिश्रण घाला. सेम प्रक्रिया संत्र्याच्या मिश्रणासह करा. आता हे सर्व एकत्र फ्रीझरमध्ये किमान 2-3 तास सेट करण्यासाठी सोडा. तीन तासांनंतर फ्रीजमधून काढून थंडगार सर्व्ह करा.