नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन म्हंटलं की मुख्य आर्कषण असतं राजपथावरील पथसंचलन. दरवर्षी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात येतं. भारतातील राज्ये आपापली संस्कृती,वैशिष्ट्य चित्रकरथांच्या माध्यमातून राजपथावर दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. यात महाराष्ट्राचाही समावेश असतोच. महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष दाखवण्यात आले आहे.