‘प्रधानमंत्री स्वानिधी योजनेमुळे’ लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार विनातारण कर्ज! काय आहे योजना?

PM Svanidhi Yojana : सध्याच्या आर्थिक तंगीच्या वातावरणात साधा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही मोठ्या भांडवलाची गरज भासत आहे. यासाठी केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुण व्यक्ती आणि उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री स्वानिधी योजना आणली आहे. या योजनेमुळे बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळवणे सोपे झाले आहे.

तुमच्याकडे चांगली संकल्पना असल्यास आणि कमीत कमी आर्थिक गुंतवणुकीसह व्यवसाय सुरू करू शकत असल्यास, हि योजना खास तुमच्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेत, तुम्ही तारण न देता आणि कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज मिळवू शकता. या उपक्रमामुळे तुम्हाला जास्त व्याजदर असलेल्या बँकांकडून पैसे घेण्याची गरज नाही. या योजनेद्वारे दिलेले कर्ज खात्यात किमान शिल्लक न ठेवता कर्ज वितरित केले जाईल.सरकार तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम देईल.

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते सुरुवातीला, 10 हजार रुपयांचे कर्ज दिले जाईल आणि परतफेड केल्यावर,अतिरिक्त कर्जाची मागणी करू शकता.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही खास कागदपत्रांची आवश्यकता यात नाही. त्यातील एक महत्त्वाचा घटक असा आहे की कर्जदार पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर, कोणत्याही व्याजाशिवाय दुसऱ्यांदा सुरुवातीच्या कर्जाच्या दुप्पट रक्कम मिळवू शकतात. परतफेड पर्यायांमध्ये एक वर्षाची कालमर्यादा आणि मासिक पेमेंटची निवड समाविष्ट आहे.

कर्जासाठी अटी काय असतील?
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. रस्त्यावरील विक्रेते ज्यांचे कोरोना महामारीमुळे आर्थिक नुकसान झाले आहे ते या योजनेमधून मदत मिळण्यास पात्र असतील. याव्यतिरिक्त, हि योजना रस्त्याच्या कडेला असलेली स्टेशनरी दुकाने आणि छोट्या कारागिरांसाठी उपलब्ध आहे. या योअंजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही हमीदाराची गरज नसेल. कर्जदार एकरकमी किंवा अनेक हप्त्यांमध्ये कर्ज मिळवू शकतो.

या योजनेद्वारे कर्जासाठी पात्र होण्यासाठी, तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. हि योजना अतिरिक्त 20,000 रुपयांच्या अतिरिक्त कर्जासोबत 10,000 रुपयांचे प्रारंभिक कर्ज देते. म्हणजेच तुम्हाला एकूण 50,000 रुपयांचे कर्ज मिळू शकते.

या योजनेद्वारे कर्ज मिळविण्यासाठी तारणाची आवश्यकता नाही आणि कोणतीही वस्तू बँकेकडे तारण ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला यात 10 हजार रुपयांचे प्रारंभिक कर्ज मिळू शकते आणि ते मासिक आधारावर तुम्ही परत करू शकता.

आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदार करत असलेल्या कामाची माहिती
पॅन कार्ड
बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे
उत्पन्नाचा स्रोत

खालील वेबसाईटवर जाऊन तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता
अधिकृत वेबसाईट https://pmsvanidhi.mohua.gov.in/