प्रभुरामचरणी १२ दिवसात ११ कोटींचे दान

अयोध्या, ३ फेब्रुवारी : अयोध्येत २२ जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर सर्वांसाठी खुले करण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येत भाविक येथे येत आहेत. भाविक प्रभू रामासमोर नतमस्तक होत दानधर्मही करीत आहेत. राम मंदिरात मागील १२ दिवसांत ११ कोटी रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या त्री १२ दिवसांत सुमारे २५ लाख ती भाविकांनी अयोध्येतील राम मंदिराला ाथ भेट देऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले. या निय कालावधीत मंदिराच्या दानपेटीत ८ कोटी रुपये रोख तसेच धनादेश आणि ऑनलाईन व्यवहारांद्वारे सुमारे ३.५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

उत्तरप्रदेशात धार्मिक पर्यटनासाठी सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात अयोध्या आणि काशी ही प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. २०२३ मध्ये ५.७६ कोटी पर्यटकांनी अयोध्येला तर, ८.५५ कोटी पर्यटकांनी काशीला भेट दिली आहे. ही संख्या २०२२ मध्ये अयोध्येत आलेल्या पर्यटकांपेक्षा ३.३६ कोटींनी जास्त आहे आणि काशीमध्ये येणाऱ्या पर्यटकांपेक्षा १.४२ कोटींपेक्षा अधिक आहे. असे जयवीरसिंह म्हणाले.