प्रभू श्रीरामांच्या ६० हून अधिक मूर्ती तयार करण्यात आल्या, या मूर्तींचा आहे समावेश

अयोध्या: अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता आणि विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. रामललाचे सिंहासन संगमरवरीने बनवलेल्या कमळाच्या फुलाच्या पीठावर ठेवण्यात येणार असून, ते गर्भगृहात बसवण्यात आले आहे. गर्भगृहात सिंहासन किती उंचीवर ठेवायचे, याचा निर्णय तज्ज्ञ घेतील. वास्तविक सिंहासनाची उंची पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या आधारे ठरवली जाईल; जेणेकरून रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे रामललाच्या कपाळाला स्पर्श करून गर्भगृहालामंदिरात वीज जोडणीचे काम पूर्ण श्री अयोध्या धाममध्ये भगवान श्री रामाच्या भव्य-दिव्य मंदिरात वीज जोडणीचे काम पूर्ण झाले. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अभूतपूर्व काम केल्याबद्दल यूपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे आभार मानले आहेत. हे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी तमाम रामभक्तांचे आणि राज्यातील जनतेचे अभिनंदनही केले आहे.

रामजन्मभूमी संकुलात ३३ किलो वॅट क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहेत. हे काम ५ डिसेंबरपर्यंतच करायचे होते, मात्र तीन दिवसांचा उशिर झाला.प्रकाशून टाकतील. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात रामललाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत प्रभू श्रीरामाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचे रथ तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यात प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून ते वनवास आणि लंकेतील प्रवास आदी कथांचा समावेश आहे. मिरवणुकीची तयारी करण्यात गुंतलेले मुख्य शिल्पकार रणजित मंडल सांगतात, या मूर्ती तयार करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. ६० हून अधिक मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यात गुरुकुल ते वनवास आणि लंकेला जाणाऱ्या मूर्ती आहेत. रामायणावर आधारित १०० भागांवर पुतळे बनवायचे आहेत.