भुसावळ : प्रयागराज रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या पायाभूत सुविधांसाठी काम करण्यात येत असून त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १८ रेल्वे गाड्या या तात्पुरत्या स्वरूपात प्रयागराज स्थानकाऐवजी प्रयागराज छिवकी येथे थांबणार आहेत.
या १८ रेल्वे गाड्यांच्या स्थानकात बदल प्रयागराज स्थानकाऐवजी प्रयागराज छिवकी स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांमध्ये गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस बुधवार, १२ जून ते २६ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकी येथे दुपारी ४.१८ वाजता येईल व ४.२० वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर एक्सप्रेस १ जून ते २५ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकी येथे ७.२० येईल व ७.२२ ला निघेल. रकसोल ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १५ जून ते २० जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला सकाळी ७.१८ वाजता येईल व ७.२० वाजता निघेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रकसोल एक्सप्रेस १७ जून ते २२ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला दुपारी ४ वा. येऊन ४.२ वाजता सुटेल. पुणे ते गोरखपूर एक्सप्रेस १३ जून ते २५ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला दुपारी ३.५० ला येईल व दोन मिनिटांनी निघेल. गोरखपूर ते पुणे एक्सप्रेस १५ जून ते २० जुलैला प्रयागराज छिवकीला पहाटे एक वाजता थांबेल व दोन मिनिटांनी निघेल. पुणे ते दरभंगा एक्सप्रेस १२ जून ते २४ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला दुपारी ३.५० वाजता दोन मिनिटे थांबेल. दरभंगा ते पुणे एक्सप्रेस १४ जून ते १९ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकी सकाळी ७.१८ वाजता दोन मिनिट थांबेल. रांची ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १२ जून ते २४ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला सकाळी १०.२८ वाजता थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते रांची एक्सप्रेस १४ जून ते १९ जुलै या काळात दुपारी ४ वाजता थांबेल. पुणे ते बनारस एक्सप्रेस ही गाडी १७ जून ते २२ जुलै या काळात दुपारी ४.१० वाजता थांबेल. बनारस ते पुणे एक्सप्रेस १२ जून ते २४ जुलैपर्यंत सकाळी ७.१८ वाजता थांबेल. दादर ते बालिया विशेष गाडी १२ जून ते २४ जुलैपर्यंत संध्याकाळी ६.३२ वाजता थांबेल. बालिया ते दादर विशेष गाडी १२ जून ते १६ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला रात्री ९.५१ वाजता थांबेल. दादर ते गोरखपूर विशेष गाडी ११ जून ते २ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला संध्याकाळी ६.३५ वाजता थांबेल. गोरखपूर ते दादर विशेष गाडी १३ जून ते २५ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला रात्री ९.५१ वाजता थांबेल. छपरा ते पनवेल विशेष गाडी १३ जून ते २५ जुलैपर्यंत रात्री १०.१९ वाजता थांबेल. पनवेल ते छपरा विशेष गाडी १४ जून ते १९ जुलैपर्यंत प्रयागराज छिवकीला रात्री १०.१९ वाजता थांबेल. बदलाची नोंद घेण्याचे रेल्वेने कळवले आहे.