प्रवाशांचे होणार हाल, ‘या’ रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द

भुसावळ :  प्रयागराज स्टेशनवरील प्लॅटफॉर्म कामासाठी अप-दोन मार्गावरील भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक 01025 दादर-बलिया स्पेशल ट्रेन 16 ऑक्टोबर ते 29 डिसेंबरदरम्यान, ट्रेन क्रमांक 01026 बलिया-दादर स्पेशल ट्रेन 18 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरदरम्यान तसेच ट्रेन क्रमांक 01027 दादर-गोरखपूर स्पेशल प्रवास ट्रेन 17 ऑक्टोबर ते 30 डिसेंबरदरम्यान व ट्रेन क्रमांक 01028 गोरखपूर-दादर स्पेशल ट्रेन 19 ऑक्टोबर ते 1 जानेवारी 2024 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.  रेल्वे प्रवाशांनी रद्द गाड्यांबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.