भुसावळ : भुसावळ विभागात पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे गाड्यांचा वेग वाढविण्यात आला आहे. यात जलंब-खामगाव, बडनेरा अमरावती, बडनेरा चांदूर बाजार सेक्शनमध्ये रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. यामुळे या गाड्या आता ताशी ९० किमी वेगाने धावू लागल्या आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहे.
गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. यामध्ये मल्टी-ट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि अन्य तांत्रिक कामे करण्यात आली आहे. याचा परीणाम रेल्वे गाड्याच्या वेग वाढविण्यावर झाला आहे. विभागातील जलंब खामगांव सेक्शन, बडनेरा-अमरावती सेक्शनवर आणि बडनेरा-चांदूर बाजार सेक्शनवर आता ट्रेन ताशी ९० किमी वेगाने प्रतितास वेगाने धावू लागली आहे. यापूर्वी ६० वेगात गाडी धावत होती.