प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ एक्सप्रेस गाड्यांना आकारणार पॅसेंजरचे तिकिट दर

भुसावळ:  तुम्हीपण रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास. कोरोना काळापासून रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांना मेल आणि एक्स्प्रेसचा दर्जा देऊन तशा पद्धतीने वाढीव प्रवासभाडे आकारत आहे. त्यामुळे प्रवाशांना जास्त भाडे वाढ सहन करावी लागत आहे.पण आता मात्र आता काही गाड्यांना तिकिट दरात सूट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

भुसावळ-नागपूर आणि अजनी-अमरावती-अजनी या दोन गाड्यांना आता गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारल्या जाणार आहे. या दोन्ही गाड्या इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेमु’ ट्रेन आहेत. त्यांना एक्सप्रेस गाड्याचे दर आकारल्या जात होते. आता या गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारल्या जाणार आहे.